तू गेल्यावर राहिले चाफ्याचे बहरणे मालवून गंध जाईचा काजव्यांचे चमकणे..! गोठले दृष्टीत अजूनी शुभ्र पुंजके तारकांचे माळले कुंतलात तेंव्हा स्पर्श ओले मोगऱ्याचे..! थबकलेले क्षण बिलोरी शिंपल्यात सांडले गुंतला श्वासात मारवा रोमरोमी कोंडले..! अवचित अधरी आल्या जुन्याच ओळी पुन्हा? पाठलाग करतो अजूनी जशी सावली उन्हा..! सोबतीला पायखुणा या मजसवे चालती अर्थ सांगू मी कसा?शब्दांवीन जे बोलती..! परतूनी येशी केधवा?आस वेडी जागते सुकली लता केतकी बहर मातीचा मागते..! ©Shankar Kamble #roseday #तू #मी #गेली #चाफा #मोगरा #गंध #मातीचासुगंध #काजवा #गेलीस