हुंकार विझले ओठांमधले वार किती झेलले होते उध्वस्त घरटे एक झुळूक ’ती’ कैक वादळे पेलले होते.. झुंडीत येते बळ साऱ्यांना मिळून लचके तोडले होते वाटा घालून आपापला घायाळ सावजा सोडले होते.. तळहाताचा फोड असां ’त्या’ जिवापाड मी जपले होते जखमां देण्या मलाच काटे फुलांमध्ये का लपले होते? शुभ्र वसने धारण करतो मन जरी मळलेले होते ध्यान लावून कित्येक बगळे घात घालण्या जुळले होते.. पोखरले वासे घराचे भुंग्याना का कळले नव्हते? किती मशाली आता पेटवू? तेल माझेच जळले होते.. दर्पणी मी पाहत नाही ’वय’ जरी टळलेले होते ताक फुंकुनी आज पितो दूध मला पोळले होते.. ©Shankar Kamble #WritersSpecial #हुंकार #वेदना #झुळूक #उध्वस्त #जखमा #फुलं #काटे