Safar हल्ली लोकं नात्यांपेक्षा पैशाला फार महत्व देतात. जे लोकं लहानपणी एका चॉकलेट चे दाताने दोन तुकडे करून प्रेमाने खायचे तेच बहीण भाऊ, बहिणी -बहिणी, भाऊ -भाऊ संपत्तीसाठी, पैश्यासाठी एकमेकांचे गळे कापत आहेत. कोर्टात एकमेकांविरुद्ध खटले दाखल करत आहेत. एकमेकांचे चेहरे बघायला नाक मुरडतात असे वैर निर्माण केलं आहे. कुठं गेलं ते बालपनिचे प्रेम, नात्यापेक्षा पैसा, संपत्ती इतका कसं काय महत्वाचं वाटतं लोकांना आज. मृत्यूनंतर सोबत काहीच नेणार नाही प्रेमळ आठवणींशिवाय हे ठाऊक असूनसुद्धा कसलं एवढं लोभ. मित्रांनो जीवन एकदाच मिळते ते आनंदाने जगा. चुका स्वीकारा, मोह सोडा, त्याग करा, नातं जपा, प्रेम करा, वैर भाव सोडा, कारण, नातं चिरकाल टिकते धन नाही. निस्वार्थी जगा आणि आनंदी जगा.. (प्रीत ) निस्वार्थी आणि आनंदी जगा