Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser8586158032
  • 675Stories
  • 32.7KFollowers
  • 8.8KLove
    1.2LacViews

अश्लेष माडे (प्रीत कवी )

कवितेच्या विश्वात रमणारा

www.instagram.com/prit_poet_ashlesh_made

  • Popular
  • Latest
  • Video
63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

शरीर उघडे पडले नागडे झाले 
तरीही झाकली मूठ सव्वा लाखाची 
एका खोलीत त्या दोघात काय घडतंय 
जिथे आधीच मिटते भूक शरीराची...

आदर्श म्हणून रितिरिवाजात लग्न होतात 
पण दगा मिळते हल्ली प्रत्येकाला त्यात चूक कोणाची 
हातमेले झाले शरीर इथे बहुतेकांचे आधीच 
भावना ही मेल्या पहिल्या रात्रीच्या त्यात चूक कोणाची...

आधी आणि नंतर ही लपूनछपून सगळंच होतंय 
त्या प्रणय क्रिडेची आस राहिली कोणाची 
कित्येक सुहागरात्री आता रोज होतात 
मग कोणाला असणार वाट त्या भावनिक पहिल्या रात्रीची...

कठीण झालं हल्ली सती सावित्री मिळणं 
अनं कोणाला गरज उरली प्रेम करणाऱ्या पतीची 
प्रेम करून तर फसवणूक केली जाते उघड्या डोळ्यांनी 
म्हणून तर लग्नाला आवश्यकता पडते फक्त संपत्तीची...

इतिहासजमा होतंय सगळं आता इथे 
जिथे आस होती एकव्रता पती पत्नीची 
ती भावनाच मरत जात आहे जी असायची पहिल्या रात्रीला 
आता तर फक्त Formality उरली समाजासमोर लग्नाची...

खरं तर रोज बलात्कार होतात इथे 
अनं दखल घेतली जाते फक्त उघड्या पडलेल्या बातमीची 
आधी लग्नानंतर व्हायचं प्रेम आणि प्रणय मर्यादेत राहून 
आता तर फक्त भूक मिटवली जात आहे प्रेमाच्या नावावर शरीराची....

म्हणून प्रेम केलंत तर लग्न ही व्हायला हवं एकाशीच 
मग कशाला फसगत करावी कोणाची 
पुरुष असो किंवा स्त्री दोघांनाही हे गरजेचं असतं 
कारण, ईच्छा च उरली ना आता अनं भावना त्या पहिल्या स्पर्शाची...

म्हणून नशिबाला आणि दुसऱ्याला दोष देत बसण्यापेक्षा 
हिम्मत करा खरं ते जगासमोर बोलण्याची 
दुसऱ्याला फसवून स्वतःची फसवणूक करण्यापेक्षा 
कदर करा हो आतातरी मिळणाऱ्या खऱ्या प्रेमाची...

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #silhouette  sad shayari very sad love quotes in hindi sad status in hindi Extraterrestrial life sad status

#silhouette sad shayari very sad love quotes in hindi sad status in hindi Extraterrestrial life sad status #SAD

63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

White लग्न कर आणि मोकळा हो 
असं सगळेच म्हणतात मला 
असेल कुणी बघितलेली तर सांग 
घेऊन येऊ तिलाच बोलतात मला..

वाटतं तितकं सोपं नसतं ना 
तरी लोकांचं बोलणं कळतं मला 
घेऊन येऊ बोलणं सोपं असतं 
पण मनात नसताना आणायचं कोणाला?

लग्न म्हणजे दोन दिवसांचा कार्यक्रम नव्हे 
कारण,आयुष्य कसं असतं कळतं मला 
मरेपर्यंत Adjust करावं लागतं ना 
कसं सांगावं हे ह्या समाजाला...

लग्न म्हणजे बाहुला बाहुली चं खेळ नाही 
सारं काही पटवावं लागतं मनाला 
घेऊन येऊ तिला म्हणणं सोपं वाटतं इतरांना 
पण, कळेल कसं जातीपातीच्या कचाट्यात सापडलेल्या समाजाला...

माणूस सोडून सारं काही बघतात इथे 
महत्व फक्त जातपात श्रीमंती नोकरी आणि पैशाला 
हवी अशी मुलगी आयुष्यात कायमची 
सगळं सोडून जी येईल फक्त महत्व देऊन मला...

प्रेम इथे कोणावरही केलं जातं काहीच न बघता 
पण खूप काही बघितलं जातं लग्नाला 
जग एका बाजूने आणि माझे मत वेगळे 
म्हणून घाई करून कष्ट नको माझ्या मनाला...

वय वाढत जातं जिम्मेदाऱ्या वाढतात 
आणि हे सगळंच कळतंय मला 
पण, लोकांना वाटतं तितकं सोपं नसतं 
हल्ली खूप काही हवं असतं लग्नासाठी मुलाकडून मुलीला....

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #love_shayari  in life quotes positive life quotes life quotes life quotes in marathi life shayari in hindi

#love_shayari in life quotes positive life quotes life quotes life quotes in marathi life shayari in hindi #Life

63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

White काहीही मिळवायची इच्छाशक्ती जर मनापासून असेल 
तर 
ते मिळवायला कुणीही अडवू शकत नाही..
हा मिळवताना मात्र 
अनेक अडचणी येतील 
काही दुरावतील काही जवळ येतील,
काही मिळवताना काहीतरी सुटेलच,
हवं असलेलं नक्की मिळेलच 
फक्त प्रयत्न न करता हार मानू नका 
कारण, अंगात काही मिळवायची धमक असली की 
कुणीच अडवू शकत नाही हे नक्की 
बहाणा हा फक्त प्रयत्न न करणाऱ्यांसाठी असतो
आणि मिळवणाऱ्यांना रस्ता नक्की दिसतो..
आणि कारणे देणारा मनापासून प्रयत्न करत नसतो 
कारण त्यांना मनापासून काहीच हवं नसतो....

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #sad_shayari  inspirational quotes quotes thoughts about love failure life quotes to love quotes

#sad_shayari inspirational quotes quotes thoughts about love failure life quotes to love quotes

63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

White जगासमोर हसणारा प्रत्येक चेहरा आनंदी असतोच असं नाही 
मनातले दुःख आणि डोळ्यातील अश्रू लपवून 
परिस्थिती समोर हतबल झालेला व्यक्ती 
फार हसतो जगासमोर 
परंतु आत मध्ये घुटमळत असतो 
स्वतःशी लढत असतो 
इतरांसमोर फार व्यक्त न होता..
रडत असतो मनातल्या मनात 
कोणालाही दुःखाचा एक कण न दिसू देता 
जगत असतो 
परिस्थिती सोबत लढत झगडत 
आणि स्वतःला दोष देत....

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #sad_quotes  very sad love quotes in hindi status for sad Entrance examination status sad

#sad_quotes very sad love quotes in hindi status for sad Entrance examination status sad #SAD

63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

White हवं ते मिळेल तिला 
तिने फक्त माझं व्हावं 
स्वप्नातील जग तिचं 
माझ्यासोबत पूर्ण व्हावं..

स्वतःसाठी मी कमी करेल 
तिने फक्त हवं ते मागावं 
वाट्टेल ते करीन तिच्यासाठी 
तिने फक्त माझ्यासाठी जगावं..

खूप दुःख सोसले आजवर तिने 
म्हणून हवं ते सुख तिला मिळावं 
साऱ्या बांधनातून मुक्त होऊन 
तिने कायमची माझ्याजवळ यावं..

फुलासारखं जपणार सारी जिंदगी तिला 
फक्त प्रेमाचा तो सुगंध तिने मला द्यावं 
एक पाकळी सुद्धा गळू देणार नाही कधी 
 एवढं तरी विश्वास तिने माझ्यावर करावं...

प्रत्येक स्वप्न पूर्ण करणार मी तिचे 
तिने फक्त शेवटपर्यंत माझं प्रेम जपावं 
अर्ध्यात मला सोडून न जाता कधी 
तिने ही आपलं खरं प्रेम सिद्ध करावं..

स्वार्थी प्रेम करणारे अनेक पाहिले आजवर 
म्हणून स्वतःचे वेगळेपण तिने दाखवून द्यावं 
प्रवाहाप्रमाणे इतरांसारखी वाहत न जाता जगाबरोबर 
मरेपर्यंत सोबतीचं मला वचन तिने द्यावं...

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #love_shayari  love story quote on love love status sad love shayari

#love_shayari love story quote on love love status sad love shayari #Love

63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

White एखादं नातं टिकवण्यासाठी 
कधी कधी काही बाबतीत 
कोणाला एकाला तरी माघार घ्यावी लागते.
नको ते विषय पकडून ठेवून 
भांडण करण्यापेक्षा 
ते विषय च कायमचं बंद केलेलं बरं..
रबरासारखं ताणण्यापेक्षा 
धाग्याने गुंतवलेलं बरं 
अशाने नातं तुटणार ही नाही 
आणि पकड पण मजबूत होईल..
हा मात्र नेहमी एकावरच 
ही जबाबदारी नसावी 
कारण, मनुष्य हा थकतोच कधी न कधी...

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #Romantic
63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

तुमच्या वाईट काळात, पडत्या काळात तूम्हाला फुकट ची Advice देणारे भरपूर मिळतील,
तुम्ही कितीही ज्ञानी, हुशार असुद्या अशावेळी तुमच्यापेक्षा कमी शिकलेले, कमी अनुभवी लोकं सुद्धा आपापल्या परीने तुम्हाला ज्ञान वाटत फिरतील,
तुम्ही चांगलं केलंत तर तेच लोकं माझा माझा म्हणतील आणि वाईट घडला,किंवा अपयशी ठरलात तर तेच लोकं तुमच्या विरुद्ध बोलतील,
जोपर्यंत तुम्ही लोकांच्या मनासारखं वागता तोपर्यंत तुम्ही चांगले असता,
ज्यादिवशी तुम्ही त्यांच्या मनाविरुद्ध वागलात त्या दिवशी तुम्ही सुद्धा वाईट ठरता,
लोकं असेच असतात, तुम्हाला यश मिळालं तर वा छान अगदी बरोबर केलं आम्ही तूझ्या सोबत होतो आणि  आहोत आम्हाला तुझ्यावर पूर्ण विश्वास होता असे बोलतील,
आणि अपयशी झालात तर, आम्ही आधीच सांगितलं होतं, हे बरोबर नाही, नव्हतं, आमचं ऐकलं नाही आता भोगत बस आपल्या मनाचं केलास तर असं बोलतील,
तुमच्या दुःखात फक्त Advice देणारे भेटतील सोबत कुणीही असणार नाही तुम्हाला एकटं पाडतील आणि बघत बसतील की, हा काय आणि कसं करतो, करते ते,
आणि सुखात सगळेच तुमच्या सोबत असतील अगदी हसत हसत, तुम्ही त्यांच्या सोबत आहात हे ही इतरांना अगदी गर्वाने सांगतील,
हे जग असंच आहे 
म्हणून लोकं काय म्हणतील, काय विचार करतील याच्या भानगडीत तुम्ही पडू नका, माहित असेलच 'शिमग्याची बोंब दोन दिवस'
लोकं हसतील, बोलतील, टीका करतील 
पण पोसतील कुणीच नाही,
शेवटी ज्याचं त्यालाच करायचंय,
म्हणून स्वतःसाठी स्वतःच्या मनाने जगा,
हरलात तर अनुभव मिळेल आणि जिंकलात तर गर्व होईल,
जगाचं विचार करत बसू नका 
आयुष्य तुमचं आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने जगा.

©अश्लेष माडे (प्रीत कवी )
63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

कधी कधी वाटतं असं मलाही 
की, तिला माझ्या पासून दूर जायचं असेल 
पण तिच्या सोबतचे काही क्षण आठवून वाटतं 
माझ्यासारखा कदाचित कुणी नशीबवान असेल...

काही क्षणाच्या भेटीनंतर जर सोडताना 
तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत असेल 
तर कशी काय ती मुलगी इतक्या सहज 
माझ्यापासून लांब जाऊ शकेल...

कधी वागते ती अशी नेहमी समजावून की,
कोणालाही शंका येणं स्वभाविक असेल 
पण वाटतं काहीही करू दे प्रेम तर आहे ना माझ्यावर 
हा जरी आता थोडाफार कमी झाला असेल...

इतरांसारखी जरी नसेल ती चरित्र्याने 
पण, माझ्याशिवाय खरंच तिचं मन दुसरीकडे वळत नसेल?
आणि वळत जरी असलं मन दुसरीकडे 
तर कदाचित माझंच प्रेम कुठंतरी कमी पडत असेल...

सारखी भीती असते मनात माझ्या 
खरंच तिला कधीतरी सोडून जायचं असेल?
की मिळवण्यासाठी मला कायमचं 
मला न सांगता घरच्यांपुढे हट्ट करून बसेल?

कळत नाही मला आजही तिच्या मनातलं 
खरंच माझ्यासाठी तिच्या मनात नेमकं काय ठरलं असेल?
देईल मला सोडून इतरांसारखी कायमची 
की, घट्ट हात पकडून कायम सोबत असेल?...

नुसत्या कल्पना असतात डोक्यात माझ्या 
माझ्यासारखं विचार खरंच तीही करत असेल?
की, बघणार स्वतःचा स्वार्थ ती भविष्यात 
आणि पुन्हा एकदा माझं हात कुणीतरी अर्ध्यात सोडलेलं असेल?

तिच्यावर तर आहे आजही विश्वास पूर्ण 
पण खरंच हाच विश्वास कायम असेल?
तीही करेल काय त्याग माझ्यासाठी कसला तरी 
की, बाकी मुलींसारखी पुन्हा माझा विश्वास तोडून बसेल?....

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #sad_shayari
63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

कोण उपयोगी पडतंय, कोण सोबत उभा राहतोय, कोण पाठ दाखवतोय, कोण हात पकडतोय, कोण दगा देतोय, कोण गोड बोलून फसवतोय, कोण अपमान करतोय, कोण संकटसमयी पळ काढतोय, कोण स्वार्थी वागतोय, कोण प्रत्येक क्षणी खंबीर साथ देतोय, कोण मजा घेतोय, कोण बदनाम करतोय, कोण खोटं वागतोय??
हे सर्व शांतपणे लक्षात ठेवायचं 
आज ना उद्या वेळ प्रत्येकाला ज्याची त्याची जागा दाखवणारंच...
वेळ कधीच बदला घ्यायला विसरत नाही..
प्रत्येकाची वेळ येतेच,
तेव्हा कोण पाया पडतोय, कोण मागे मागे करतोय, कोण गोड बोलून स्वतःचा स्वार्थ साधतोय सगळं कळते,
फक्त आपलं मन तेव्हा चांगलं काही करण्याची ग्वाही देत नाही..
कारण, रस्त्यात लागलेली ठेच दगड बाजूला करायला भाग पाडतेच..
म्हणून वेळ चांगली असली की कोणाला कमी समजू नका, माज करू नका
कारण, वाईट वेळ आली की लोकं भाव सुद्धा देत नाही अशांना..
पैसा, संपत्ती, सुंदरता हे सारं काही क्षणिक आहे 
मौल्यवान आहे ती फक्त वेळ...

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #Broken
63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

पहिली भेट पहिली ओढ तुझी 
कायम माझ्या लक्षात राहील 
जिथे जिथे होईल भास तुझा 
तिथे तिथे फक्त तुझाच शोध राहील...

बघताच पहिल्यांदा तुला साडीत 
चरणी सुगंधी फुल तूझ्या वाहिल
घेऊन हातात हात तुझा कोमल 
तुला ह्या हृदयात सामावून घेईल...

नजरेतून जाईना तुझा चेहरा 
कळेना ही पहिली भेट मला काय देऊन जाईल 
बघितलं जेव्हा तुला पहिल्या क्षणी 
नव्हतं वाटलं कुणी माझं हृदय चोरून घेऊन जाईल...

©अश्लेष माडे (प्रीत कवी )
loader
Home
Explore
Events
Notification
Profile