जरासे.... क्षणभंगुर हे श्वास लाभले शाश्वत जगणे करू जरासे आडोशाला पळभर थांबून निसटले ते स्मरू जरासे.. अभेद्य आणि भरभक्कम कर तटबंदी तू पुन्हा मनाची घात घालूनी टपले वादळ पिसाट होवून भरू जरासे.. कोळून प्यालो आज हलाहल घोट रिचवले तसेच ओठी चिरडलेल्या तृण पात्याचे भाले करुनी मरू जरासे.. सैरावैरा धावत सुटले निमिष एक ना कुठे थांबले अकलेच्या या व्यर्थ वल्गना घासून ठिणगी पुरू जरासे.. शिडावीना ही नाव भरकटे खेळ हवाली तुझ्याच लाटे पोहीन म्हणतो पाठ प्रवाही बुडलो,तरलो उरु जरासे.. खूप मागणे खूप सांगणे टिचभर झोळी गगन झाकणे एक आरोळी रान पेटवू निशाण रोवून ठरू जरासे.. ©Shankar Kamble #titliyan #श्र्वास #जीवन #जीवनअनुभव #लढा #युद्ध#संग्राम #जीवनगाणे #लढायचं