Nojoto: Largest Storytelling Platform

चिरा–चिरा घडवून श्रमाने मानवतेचे बांधू मंदिर क्षणभ

चिरा–चिरा घडवून श्रमाने
मानवतेचे बांधू मंदिर
क्षणभंगुर श्वासाचे देणे
प्रेमे नांदो आपण सहोदर..

हेवा जावो धुवून मनाचा
निर्मळ व्हावे आता अंतर
द्वेश,किल्मिषे जाळून टाकू
करू मोकळे भरले अंबर..

भार उचलू मिळून सारे
एकजुटीची मूठ आवळू
निढळावरचा घाम सांडता
गंध मातीचा फुले परिमळु..

बंद कवाडे करून मोकळे
साद ऐकू रे अंतरीची
ताल देवूनी हृदय सांगते
गती एक ती एकपणाची..

नवे पंख अन् नवी आव्हाने
रोज खुणावे क्षितिज मोकळे
कवेत घेण्या आकाशाला
तोड बंधने जुने, खुळे..

©Shankar Kamble #Light #मानवता #माणूस #जीवन #जगणं #जीवनअनुभव #उड्डाण#भरारी
चिरा–चिरा घडवून श्रमाने
मानवतेचे बांधू मंदिर
क्षणभंगुर श्वासाचे देणे
प्रेमे नांदो आपण सहोदर..

हेवा जावो धुवून मनाचा
निर्मळ व्हावे आता अंतर
द्वेश,किल्मिषे जाळून टाकू
करू मोकळे भरले अंबर..

भार उचलू मिळून सारे
एकजुटीची मूठ आवळू
निढळावरचा घाम सांडता
गंध मातीचा फुले परिमळु..

बंद कवाडे करून मोकळे
साद ऐकू रे अंतरीची
ताल देवूनी हृदय सांगते
गती एक ती एकपणाची..

नवे पंख अन् नवी आव्हाने
रोज खुणावे क्षितिज मोकळे
कवेत घेण्या आकाशाला
तोड बंधने जुने, खुळे..

©Shankar Kamble #Light #मानवता #माणूस #जीवन #जगणं #जीवनअनुभव #उड्डाण#भरारी