पिवळं सोनं सुपीक काळ्या आईत मिरगात पेरलं होत हळदीचं बेणं धगधगत्या वाऱ्यात देवभरोसे सोडलं होत पावसाचं लेणं कवकवत्या वेदनांत दिनरात मांडलं होत काबाडकष्टाचं देणं रखरखत्या उन्हात स्वप्नात चाललं होत हर्ष उल्हासाचं येणं मातृवत पूजत पुत्रवत जपत चैत्रात अखेर मिळालं हे मेहनतीचं पिवळं सोनं आता आस एवढीच की या मेहेनतीला व्यापारी अन सरकार देईल का चांगलं योग्य नाणं..??? ©रामदास नरवाडे पाटील #Turmeric #farmer #marathi #kavita #maharashtra #Motivation #Kisan #कविता