Nojoto: Largest Storytelling Platform

सारं घर हिरमुसलंय, सुनं सुनं झालंय ! त्या घरात पुन

सारं घर हिरमुसलंय, सुनं सुनं झालंय !
त्या घरात पुन्हा ' समृद्धी ' पहायची आहे मला...🙂
खूप पाणी वाहिलं आमच्या 'अरु' च्या डोळ्यातून,
तिचा गोड, हसरा चेहरा पुन्हा पहायचा आहे मला...
आजवर नाईलाज म्हणून राहिले ना ते घरात?
बाबांना मनापासून वावरताना पहायचं आहे मला...
किती शांत झालेत आप्पा सुद्धा आजकाल!
त्यांचे गंमतीदार टोमणे पुन्हा ऐकायचे आहेत मला...
आंबट-गोड आजी ला एक निरोप सांगा माझा,
तिची पुर्वीसारखी लगबग पुन्हा पहायची आहे मला...
गोड चॉकलेट केक आता कडवट चेहरा करुन बसलाय!
अभी ला पुन्हा एकदा भरभरुन हसताना पहायचं आहे मला...
पुरे झाली रागावलेल्या यश ची चिडचिड!
त्याला पुन्हा गिटार घेऊन गाताना पहायचं आहे मला...
सर्वांची काळजी करणारी गौरी आता एकटी पडली आहे!
तिला पुन्हा घरात मिसळून जाताना पहायचं आहे मला...
धक्का बसलेल्या ईशा चा सुकून गेलाय चेहरा,
तिला मस्ती करत बागडताना पहायचं आहे मला...
साधी भोळी विमल फार काळजी करते आई ची!
तिला बडबड करत घरभर फिरताना पहायचं आहे मला...
संजना दूर गेली खरी समोर येणारया संकटापासून,
पण, तिला चूक सुधारताना पहायचं आहे मला...
खूप झालं राग, रुसवे, भांडण आणि अबोला!
पुन्हा आनंदी, हसत्या-खेळत्या देशमुखांच्या घरी रहायचं आहे मला... ❤

कवयित्री 
- @sumedhian_poetess 
( अनघा नेहा नरेंद्र उकसकर )

©Anagha Ukaskar #aaikuthekaaykarte! #MarathiKavita #marathiserial #Shayari #popularquotes 

#dawn