Nojoto: Largest Storytelling Platform

हुंदक्यात आयुष्याचे गाणे सजले होते सर नव्हती पावसा

हुंदक्यात आयुष्याचे गाणे सजले होते
सर नव्हती पावसाची आभाळ भिजले होते..

भणंग जिंदगीची वणवण कशास सोसू?
खंजीर खुपसले पाठी कट मागे शिजले होते..

खोल गेले पोट त्यांचे, त्यांचा झालासे नगारा
ते शांत साखर झोपी कुणी तसेच निजले होते..

फुंकतेस कशाला?चुल आहे पेटलेली
नजरेत भूक जळते अंगार विझले होते..

शाप दे वा वर दे सोय तुझी तू पाहून
तुजं कैद मंदिरी केले मी मनांत पुजले होते..

गाढलेला उकरून पुन्हां देह बाहेर काढला
सापडेना माणूस कुठे माणूसपण कुजले होते..

डोके गहाण ठेवून विकतो मलाच आता
बोली लावण्यास कैक दलाल जमले होते..

फोडून खापर माझ्यावर जो तो धन्य होतो
मूढ मती मी उशीरा गमते काय चुकले होते..

©Shankar Kamble #Light #जिंदगी #जीवन #जीवनअनुभव #जगणे #माणूस #लढा #माणूसम्हणूनजगताना #फासा #गूढ
हुंदक्यात आयुष्याचे गाणे सजले होते
सर नव्हती पावसाची आभाळ भिजले होते..

भणंग जिंदगीची वणवण कशास सोसू?
खंजीर खुपसले पाठी कट मागे शिजले होते..

खोल गेले पोट त्यांचे, त्यांचा झालासे नगारा
ते शांत साखर झोपी कुणी तसेच निजले होते..

फुंकतेस कशाला?चुल आहे पेटलेली
नजरेत भूक जळते अंगार विझले होते..

शाप दे वा वर दे सोय तुझी तू पाहून
तुजं कैद मंदिरी केले मी मनांत पुजले होते..

गाढलेला उकरून पुन्हां देह बाहेर काढला
सापडेना माणूस कुठे माणूसपण कुजले होते..

डोके गहाण ठेवून विकतो मलाच आता
बोली लावण्यास कैक दलाल जमले होते..

फोडून खापर माझ्यावर जो तो धन्य होतो
मूढ मती मी उशीरा गमते काय चुकले होते..

©Shankar Kamble #Light #जिंदगी #जीवन #जीवनअनुभव #जगणे #माणूस #लढा #माणूसम्हणूनजगताना #फासा #गूढ