आभाळ पेलू पंखावरती नकोच उसनी जमीन आता दूर खुणावे बेट एक ते कवेत घेवू जाता जाता.. मुठीत केली कैद वादळे धार नव्याने आवेशाला आव्हानांच्या छाताडावर पुन्हां नाचवू तलवारीला.. सामर्थ्याच्या विशाल लहरी कोण थोपवी?कुठला सागर? लांघला केंव्हाच किनारा मनगटांच्या या जोरावर.. रडणे , कुढणे आता नाही मस्त कलंदर जगणे झाले भिरकावले मी किती मुखवटे कशांस गणती आले गेले?.. खाच खळगे वाट भरली तडां जाईल दर्पणाला ताठ माने नजर भिडव रे तू तुझ्याच अंतराला.. गहाण टाकू नको स्वतःला उंबऱ्याची नको चाकरी आत्मसन्मानाची दौलत सन्मानाची कमव भाकरी.. ©Shankar Kamble #Flower #पंख #झेप #उड्डाण#आकाश#जमीन #विश्वास #“विश्वास” #कवीता