Nojoto: Largest Storytelling Platform

वेदनेचा बाजार मांडला दुःख विकण्या सांगतो मी भार दा

वेदनेचा बाजार मांडला दुःख विकण्या सांगतो मी
भार दाटला पुन्हा ढगाला डोळ्यांत पाऊस मागतो मी

पेटलेल्या उन्हांत आता झाड सोसते तप्त झळाला
आठवून मग उंबऱ्याला जीव उगां का जाळतो मी?

मतलबी दुनियेत होते पायपुसणी भाबड्याची
कातडी जपतो स्वतःची पारखून जग वागतो मी

टांगली कित्येक स्वप्ने का नव्याने न्याहाळतो?
देवून चकवा पांगलेल्या पाखरांना भांडतो मी

माखलेल्या गर्द हळदीचा गंध  ना लाभला
रंगल्या मेहंदीतल्या हातांस दूर पाहतो मी

सळते जीवांला जाळतेही पुन्हा पुन्हा ती सांगते ही
भंगलेल्या राऊळाच्या पायरीला थांबते मी 

उघड्यावरचा असा पसारा आज वाटतो आवरावा
गाठोड्याचा भार शिरावर मूकपणाने चालतो मी

©Shankar Kamble #Past #गझल #वेदना #दुःख #जीवन #जगणे #जगणं #सांजवेळ