बांदान चालली पांभर पेरणाची पेरते व्हा पक्ष्यांच सांगण.... डौलत बैलजोडी निघाली डुलत माझ्या बांधन..... चीवचीवाट पक्षी झाडाहुन माझी गंमत पहाती..... जोडी बैलाची नवरंगी काढणी..... घुंगराची वट्टी बि पडती चाड्यातुनी भेटण्या जमीनीसी.... ओलसर जमीनीची सांगड माझ्या औतासी.... भुरूभुरू नांगर फळीची हौस मोठी.... औतावर बसण्याला लहानग्याची हट्टाची बाजी...... मातीचा वीर खरा बळीराजा कोपरी चिखलाची ...... मोगणारी खाद आई माझ्या सोबती..... आंबट लोणच्याची न्याहारी कालवणाची चव भारी.... अलगद भुमंडल तरंगुनी घेई शेतकरी..... चिखल माती तिफण वावरा मंदी..... खेळण मातीच खेळणी लहान पोर हौसी..... चमकला पाऊस दुरवरचा आभाळ झाकल.... चारा नंदीचा , मी पांघरल शेल...... चिवचिवाट मोठा झाडाझुडपांचा .... पाणी शेंदण्या विहरिच तहानलेला होईल तृप्त... चरट डबक बारब माझ्या आज्याच ...... जीवन खेड्याच कोण म्हणतय येड्याच..... भरून चिखलात पाय कष्टाची कशी समजणार ही मौज... अमृतापरी घास कष्टाचा भाकर घामाची..... उभ्या जगाचा काळजी शेतकरी मोठा दिलदार..... जोमान लढणारा पुन्हा..... भाकर कष्टाची ..... #shetkari