( ही एक निबंध वजा कविता आहे. एक Company आणि तिला पडलेलं स्वप्नं यातून सुरक्षितता चा संदेश देणारी एक कविता..एका कंपनीसाठी काम करणारे कामगार हेच सर्वकाही असतं. आणि ते जर नसतील तर त्या कंपनीचे अस्तित्त्व हे असून नसल्यासारखं असतं, थोडक्यात शून्य असते. थोडक्यात Company चे मनोगत ) तुमच्याशिवाय मी शून्य...! दिवसभराच्या गोंगाटात तिजलेली मी तुमचीच स्वप्ने मनी घेऊन निजलेली मी, Siren चा कर्कश आवाज झाला नुकताच लागलेला डोळा पुन्हा जागा झाला. आनंदाला बहर यावी, त्यात तुमची Entry व्हावी माझ्या लेकरांना पाहून मनी समाधानाची लहर उमटावी.. अस्वस्थ मनाचे नंदनवन पुन्हा बहरून आले झाडाभोवती फुलांचा सडा तसे माझे मन झाले, मनाच्या हलक्या कोपऱ्यात रात्रीच्या स्वप्नांचे भेदरणारे ढग जमा झाले, पौर्णिमेच्या फुललेल्या चंद्रावर जणू काळे ढग नव्याने आले. स्वप्न तस भयाण होतं माझ्या लेकरांच्या निष्काळजी पणाचे एक उदाहरण होतं, कुणाच्या हातावर Acid डोळ्यात chemical कुणाच्या पायावर drum चं आच्छादन होतं, सुरक्षा साहित्यांचा वापर न केल्याचं ते एक प्रमाण होतं.. नशीब ते एक स्वप्न होतं म्हणून जीवाला थोडा धीर यावा, म्हणून म्हणतो लेकरांनो काम करताना सुरक्षा साहित्याचा वापर करावा. हातामध्ये ग्लोव्हज , नाकावर मास्क डोळ्यावरती सुरक्षेचा पारदर्शी चष्म्या घालावा, डोक्यावर हेल्मेट आणि अंगावरती safety चा पदर घ्यावा. स्वप्नात का होईना पण माझं मन उदास झालं, तुमच्याशिवाय माझं कसं याच कल्पनेनं मनामध्ये एक प्रशचिन्ह उभा राहील. तुम्ही सुरक्षित असाल तर मलाही थोडं बरं वाटतं, कारण तुमच्याशिवाय माझं अस्तित्व माझंच मला शून्य वाटतं. माझंच मला शून्य वाटतं.... ©Varpe Pandhari #MusicLoसुरक्षाve