होडी निघाली डोंगर सैरकरत करत नटलेली सारी मखमलीत ध्वज फडकवत जलसुंदरी.. गरगर फिरणारा भात्या जसा नाखवा दादा पुढे हाकणारा डोंगा.. समवान झाली सकाळ मला हाकमारी थंडी ,उन्हात हा खेळ सारा.. पाण्यावरचा खेळ सारा डुगडुगणारा हा जणु पाळणा.. स्वप्नही काय पडले हिरवाईने झेललेली ती नदि मोठ डबक तिच्या शेजारी.. सुगरन माझी होडी जशी पारकरी रस्ता मला पुढे खेचणारी. ह्या अंगाला कधी कलंडल पाण्यात बुडालेली, लाकड्या फळीवर सारी मैफिल बसलेली.. शुद्धतेचे जग सारे वाटते होडीतुन वेचणारे खडे नदिचा तळ हाले.. प्रहरी सकाळची रंगीबेरंगी सुर्याला गवशी घालणारे गोळा झाले सारे थवे.. आसमंताच्या भेटिला आले सारे फुफाटा ढवळा त्या डोंगरावर उन्हात सांडलेला.. शुभ्र नितळ खळखळा, ओंजुळीतला घोट जशा पाण्याचा . शांत सुखांत डोळे मिटुन निद्रेच्या पाऊलांनी ओढलेली तंतु माझी होडी.. स्वप्नात साखर निद्रेत साचलेले दृश्य सार माझी साखर झोप चाललेली.. मैलभर अंतर चाललेली नाखवादादा दमदार भात्या ओढी.. डुलत डौलत रेंगळत चालली माझी नक्षीदार होडी.. माशांच अंगण सार तळाला नटलले खडकात घर कोरलेलं.. रंगीबेरंगी ढिगात राहणारे चमकेरी जसे पाण्यातले काजवे.. हरवले घर जणु पाण्यात आलेले.. पैलतिराची माझी डगमगणारी ईवलीसी होडी... झोपेत माझ्या मी निसर्गाच चित्र गिरवी... २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ह #मराठीकोट्स #collab #yqkavyanand #sateeshranade #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade #मराठीलेखणी