Nojoto: Largest Storytelling Platform

जळणाऱ्या त्या चितेकडे उगां एकटक पाहत बसलो आत पेटला

जळणाऱ्या त्या चितेकडे उगां एकटक पाहत बसलो
आत पेटला जाळ तरी राख उद्याची वाहत बसलो

दबा धरून बसलेल्या श्वानांच्या झुंडी जागोजागी
लचके तोडून कशा हसती पाठ शांतीचा सांगत बसलो

जात माझी तोलतो "तो "पारड्यात ठेवून माणुसकीला
माप भरण्या माणुसकीचे मीच मला मग कापत बसलो

पोतलेला रंग निखळतो खपली उडते पुन्हा पुन्हा
पाया खचला तुझाच वेड्या दोष घराला देतं बसलो

विरक्तीचे हे भस्म लिंपूनी सोहळा झाला देखणासा
पोळे पाहून मधुर घटाचे एकाक्षाने सेवत बसलो

डोळ्यांच्या खाचा झाल्या मन पाझर पाझर आटले
खणतोय पुन्हां तळ आता बळ उसने मागत बसलो

चूल आहे विझली माझी काळोख दाटला भवती
चिमण्यांची फडफड नुसती सूर्यास ऐकवीत बसलो

पायांना माहित कुठले? वाटेचे बंड अघोरी
धुडकावून रुळल्या वाटा पथ नवीन शोधत बसलो

©Shankar Kamble #Parchhai #गझल #मराठीप्रेम #मराठीविचार #मरण #चीता #भस्म #जीवन #मृत्यू