Nojoto: Largest Storytelling Platform

हळूहळू आता कळतंय बाप सणासुदीला कुठं जायचा.. ? थकू

हळूहळू आता कळतंय 
बाप सणासुदीला कुठं जायचा.. ?
थकून भागून आल्यावर सुद्धा
 माझ्याकड हसून पाहायचा...

हळूहळू आता कळतय
बाप शिळ्या भाकरीला का खायचा..?
भूक असली तरी त्याला
न जेवता ढेकर यायचा ..

हळूहळू आता कळतंय
बाप फाटक्या सदऱ्यात का दिसायचा..?
माझ्या शाळेची खाकी बघूनच
तो सहज खुश व्हायचा...

हळूहळू आता कळतंय
बाप दवाखाण्यात का नाही जायचा..?
जबाबदारीच्या ओझ्याणं
बाप माझा बरा व्हायचा..

बाप माझा बरा व्हायचा..

©गोरक्ष अशोक उंबरकर
  baap