नको वाटते असे तुझे पुन्हां पुन्हां बरसणे, त्या बहराने मोहरणे आता झेपणे नाही... नको वाटते शृंगाराने तुझिया लुब्ध होणे, उपासक तव रूपाचा होणे आता जमणे नाही... नको वाटते मजवरी तव धारांनी बरसणे, पावसाशी सलगी करणे आता सोसणे नाही... नको वाटते तुझे माझ्यासाठी हार मानणे, खोटा खोटा खेळ जिंकणे आता भुलणे नाही... नको वाटते प्रेमाचे हे बंध विसरूनी जाणे, नजरेत मीच माझ्या गवसणे आता होणे नाही... #love