Nojoto: Largest Storytelling Platform

पंढरीची वारी॥ वाटे मज करु॥ हाती ध्वज धरु॥ विठ्ठलाच

पंढरीची वारी॥ वाटे मज करु॥
हाती ध्वज धरु॥ विठ्ठलाचा॥१॥

चंद्रभागे तिरी ॥ स्नान चला करु॥
पहाट पहरु ॥ नाम घेऊ॥२॥

कर कटा वरी॥ पांडुरंग उभा॥
दर्शनाची मुभा ॥ सकलांना॥३॥

किर्ती रुपे ऊरु॥ ऐकुया कीर्तन ॥
आनंदले मन॥ विठुपायी॥४॥

नाम त्याचे स्मरु॥ पाहुनिया स्वरुप ॥
डोळ्यात ते रुप ॥ सदा भरु॥५॥
●॰जय हरी विठ्ठल ॰●
मोहन सोमलकर नागपुर

©Mohan Somalkar
  #रुप