Nojoto: Largest Storytelling Platform

✍️✍️काहीतरी लिहावंसं वाटलं....✍️✍️ खूप काही लिहाय

✍️✍️काहीतरी लिहावंसं वाटलं....✍️✍️

खूप काही लिहायचं होतं
पण नेमका विषयचं सापडेना,
शांत मिटले नयन तरी
डोळ्यासमोरील काळोख हटेना.
उदास , बेचैन , एकट मन
असंख्य विचारांच्या जाळ्यात अडकलं,
कितीतरी दिवसांनी आज
काहीतरी लिहासवं वाटलं....😊

कोणावर ? कश्यासाठी ?आणि का लिहू ?
याचंच प्रशचिन्ह समोर दिसत होतं,
पण काहीतरी नवीनच लिहू
अस मात्र सारखं वाटायचं.
घेतला कागद काढली लेखणी
अक्षरांनीही शब्दांचं घर गाठलं,
का ? कुणास ठाऊक ? पण 
आज काहीतरी लिहासवं वाटलं....😊

क्षणिक सुखावर की 
हसऱ्या चेहऱ्यामागे लपलेल्या दुःखावर लिहावं,
हरवलेल्या माणसातल्या माणुसकीपणावर की
पिसाळलेल्या जनावारांकडं पाहावं.
प्रेम , मैत्री ,कुटुंब की आणखी काही
अनेक विचारांचं घरटं मनी साठलं ,
विषयांच्या चक्रव्यूहात अडकलो खरा
पण आज काहीतरी लिहावंसं वाटलं....😊

अबोल मनाचे झाकलेले दरवाजे
कधीतरी उघडावेचं लागतील,
समजुतीनेचं शब्दांनी शब्द मांडावे
तेच काहीतरी मार्ग दाखवतील.
झाडांचं दुःख मांडाव तर
आत्महतेने शेतकऱ्यांचं आभाळ फाटलं,
कुठून तरी सुरवात व्हावी
म्हणून आज काहीतरी लिहावंसं वाटलं....😊

फक्त लिहीत चाललो होतो
कशावर लिहतो कळतंच नव्हतं ,
मनातील भावना आणि पेनाच्या शाईने
कागदावर मात्र कवितेचं ठसं उमटलं .
वाटलं होतं मनाचं ओझं कवितेद्वारे हलके करू
पण मनी विषयाचं बारीक धुकं दाटलं,
काही खास तर लिहलं नव्हतं
पण काहीतरी लिहल्याचं समाधान मात्र मनी दिसत होतं..☺️
                                       Pandhari Varpe
                                          8698361992

©Varpe Pandhari #.... marathi kavita
✍️✍️काहीतरी लिहावंसं वाटलं....✍️✍️

खूप काही लिहायचं होतं
पण नेमका विषयचं सापडेना,
शांत मिटले नयन तरी
डोळ्यासमोरील काळोख हटेना.
उदास , बेचैन , एकट मन
असंख्य विचारांच्या जाळ्यात अडकलं,
कितीतरी दिवसांनी आज
काहीतरी लिहासवं वाटलं....😊

कोणावर ? कश्यासाठी ?आणि का लिहू ?
याचंच प्रशचिन्ह समोर दिसत होतं,
पण काहीतरी नवीनच लिहू
अस मात्र सारखं वाटायचं.
घेतला कागद काढली लेखणी
अक्षरांनीही शब्दांचं घर गाठलं,
का ? कुणास ठाऊक ? पण 
आज काहीतरी लिहासवं वाटलं....😊

क्षणिक सुखावर की 
हसऱ्या चेहऱ्यामागे लपलेल्या दुःखावर लिहावं,
हरवलेल्या माणसातल्या माणुसकीपणावर की
पिसाळलेल्या जनावारांकडं पाहावं.
प्रेम , मैत्री ,कुटुंब की आणखी काही
अनेक विचारांचं घरटं मनी साठलं ,
विषयांच्या चक्रव्यूहात अडकलो खरा
पण आज काहीतरी लिहावंसं वाटलं....😊

अबोल मनाचे झाकलेले दरवाजे
कधीतरी उघडावेचं लागतील,
समजुतीनेचं शब्दांनी शब्द मांडावे
तेच काहीतरी मार्ग दाखवतील.
झाडांचं दुःख मांडाव तर
आत्महतेने शेतकऱ्यांचं आभाळ फाटलं,
कुठून तरी सुरवात व्हावी
म्हणून आज काहीतरी लिहावंसं वाटलं....😊

फक्त लिहीत चाललो होतो
कशावर लिहतो कळतंच नव्हतं ,
मनातील भावना आणि पेनाच्या शाईने
कागदावर मात्र कवितेचं ठसं उमटलं .
वाटलं होतं मनाचं ओझं कवितेद्वारे हलके करू
पण मनी विषयाचं बारीक धुकं दाटलं,
काही खास तर लिहलं नव्हतं
पण काहीतरी लिहल्याचं समाधान मात्र मनी दिसत होतं..☺️
                                       Pandhari Varpe
                                          8698361992

©Varpe Pandhari #.... marathi kavita