सकाळच्या धावपळीत जेवण बनवताना, समोरच्या खिडकीतून आवाज आला... शाब्बास, आई मुलाला तिच्या ८ वर्षाच्या मुलाला म्हणाली... चटकन डोळे पाणावले अन् एका अगदीच जवळच्या, आणि आवडत्या व्यक्तीची आठवण आली... डोळ्यातून टपकण पाणी आले... आणि आजोबांबरोबर चे पूर्वीचे दिवस आठवले... घरातील मोठे आणि वडीलधारी म्हणून सगळ्यांवर धाक होता... राग भयंकर, पण मनाने प्रेमळ म्हणून, गावामध्ये वेगळाच रुबाब होता... आई-वडिलांच्याही आधी त्यांचा मान होता, आवडीने सगळेजण म्हणायचो बाबा... हातामध्ये काठी अन् दोरिवाला चष्मा, अत्यंत प्रेमळ स्वभावाचे होते आमचे आजोबा... रागही तसा भयंकरच म्हणा, पण अगदी थोड्याच वेळात शांत व्हायचे... गोडीगुलाबिने आपली चूक समजावून, तितक्याच मायेने जवळ करायचे.... रात्रीचे जेवण लागायचं गरमागरम,तेही खूप तिखट... थोडे जरी झाले खार नाहीतर बेचव, तर त्यांचा राग शांत करताना आजीची स्थिती व्हायची फारच बिकट... दुकानात जायचं असेल तर सगळ्यात आधी माझच नाव घ्यायचे... पण त्यातही मज्जा अशी की, खाऊसाठी दोन नाहीतर पाच रुपये ठरलेलेच असायचे... बाजारातून खाऊ मात्र न चुकता आणायचे... आणि कधी नाहीच जमल तर, प्रत्येक नातवंडाच्या हातावर पाच-दहा रुपये नक्की ठेवायचे... -Sanchita Kekane #आजोबा