Nojoto: Largest Storytelling Platform

।। सांभाजी राजे ।। पुरंदरावर एक नवीन स्वप्न जन्

।।  सांभाजी राजे ।।

पुरंदरावर एक नवीन 
स्वप्न जन्मास आले 
नामकरण त्यांचे 
संभाजी झाले ।१।
रूपच गडाचे बदलून गेले 
रयतेच्या मनामध्ये 
युवराज जन्मास आले 
हे बोल निघु लागले ।२।
वयाच्या अडीच वर्षातच
आईच्या मायेचा पदर उडाला 
आणि लहानसे शंभूबाळ
आईच्या मायेला पोरखा झाला ।३।
जिजाऊंच्या संस्काराने 
ते पावन जहाले 
भाषा विद्या सर्व गोष्टी 
शिकण्यात ते निपुण झाले ।४।
त्यांचे शब्दाचे गुंफण
म्हणजे तलवारीच्या पात्यासारखी 
आणि नजर होती 
सूर्याच्या तेजासारखी ।५।
सिदधी , फिरंगी औरंगजेब यांच्याशी 
ताकदीने ते लढले 
सलग नऊ वर्ष स्वराज्याच्या 
अस्मितेसाठी जीवन अर्पण केले ।६।
                                            - सुजाता बानगुडे #संभाजीमहाराज
।।  सांभाजी राजे ।।

पुरंदरावर एक नवीन 
स्वप्न जन्मास आले 
नामकरण त्यांचे 
संभाजी झाले ।१।
रूपच गडाचे बदलून गेले 
रयतेच्या मनामध्ये 
युवराज जन्मास आले 
हे बोल निघु लागले ।२।
वयाच्या अडीच वर्षातच
आईच्या मायेचा पदर उडाला 
आणि लहानसे शंभूबाळ
आईच्या मायेला पोरखा झाला ।३।
जिजाऊंच्या संस्काराने 
ते पावन जहाले 
भाषा विद्या सर्व गोष्टी 
शिकण्यात ते निपुण झाले ।४।
त्यांचे शब्दाचे गुंफण
म्हणजे तलवारीच्या पात्यासारखी 
आणि नजर होती 
सूर्याच्या तेजासारखी ।५।
सिदधी , फिरंगी औरंगजेब यांच्याशी 
ताकदीने ते लढले 
सलग नऊ वर्ष स्वराज्याच्या 
अस्मितेसाठी जीवन अर्पण केले ।६।
                                            - सुजाता बानगुडे #संभाजीमहाराज