Nojoto: Largest Storytelling Platform

तेंव्हा डियर शाळा...!! डियर शाळा सांग ना काय शिकू

तेंव्हा डियर शाळा...!!

डियर शाळा सांग ना काय शिकू?
तुझ्या वर्तनवादी पद्धतीतून कस शिकू?
जिथ गुरूजी शिकवतात त्यांच्याच मनासारख
तुझ्या भिंती दगडाच्या नको वागुस दगडासारख
तेंव्हा डियर शाळा सांग ना काय शिकू? कसा शिकू?

ही भूक भाकरीची असती तर रेशनिंग
किडक धान्य खाऊन शमली असती
"असर" चा असर होऊन गुणवत्ता वाढेना 
अन् दफ्तराच ओझे कमी करता होईना 
तेंव्हा डियर शाळा सांग ना काय शिकु? कसा शिकू?

लावली जाती शिस्त त्यासाठी शिक्षा 
ठरवतात आमची गुणवत्ता ह्या सत्र परीक्षा
अन तेव्हा बक्षीसांचे अमिषही सोबतीला

गृहपाठ, पाठांतरमुळे आकलन दुरच 
यात मायबापाला वाटतय लेकरू अभ्यासू झालय
पण माझ पुढे पाठ मागे सपाट अस ज्ञानाला रूप आलय

गुरूजी तुमचा मार अन् अपमान शिकणंच थांबवतात
कारण तेंव्हा आमच्या मेंदूच्या भावनाच भांबवतात
भावना होतात जोरात अन् आम्ही मात्र त्याच स्तरात

प्रश्न न विचारू देण अन शैक्षिणिक वातावरण नसणं
आम्हाला हेच हायस वाटणं
तरीही आपला 'प्रगत शैक्षिणीक महाराष्ट्र' 

झाल गेल ते विसरून जाऊ 
विद्यार्थीकेंद्री नवशिक्षणाच विश्व नव्याने उभारु
शिकेल मी स्वयंप्रेरणेतुन स्वतः च्या अभिव्यक्त वचनाने
तयार होतील संधीप्रधान शाळा माझ्या ज्ञानरचनेने 
तेंव्हा ती माझी डियर शाळा तूच असशील !!
____________________________
   ( राजेश नंदा व्ही. मुळे) Dear Shala

rajeshmule3577

rajesh mule

New Creator