Nojoto: Largest Storytelling Platform

अस्तित्व स्वतः चं.. कधी तरी लिहून बघ मनातलं स्वप

 अस्तित्व स्वतः चं..

कधी तरी लिहून बघ मनातलं
स्वप्न तुझ्या ते कल्पनेचं..
कधी तरी जगून बघ तुझ्यासारखं
बाह्य विश्वाच्या नको कुठल्या त्या बंधनाचं..

असाच राहीलास तू मोकळा 
हे मोल तुझं होईल कवडी मोलाचं..
देण्यासारखं विकून बघ काहीतरी
शिकुन चांगलं परीपक्वाचं..

सुगंध मी दरवळलेला पाहीलाय ? 
अत्तरांच जो दाखवतो मी असण्याचं..
मन माझं ओढ लावून अजून शोधतय 
खरं रूप पाहण्यास ते स्वतः चं..

कवी लेखक:- श्री सचिन सदाशिव झंजे

©Sachin Zanje
  #सचिनझंजे.#विचार #स्वतःला_शोधताना