Nojoto: Largest Storytelling Platform

आजूबाजूला बघ जरा बरीच जोडपी छत्रीच्या आडोश्याने बस

आजूबाजूला बघ जरा
बरीच जोडपी छत्रीच्या आडोश्याने बसलेली दिसतील
बघ , माझी आठवण येते का

जर्किन तू नेहमीप्रमाणे विसरलेली असशील
पण आता जर्किन शेअर करायला तुझ्याबरोबर कोणी नसेल
बघ , माझी आठवण येते का

पावसाचे थेंब तू अलगद बघशील
एखादा थेंब हातात हि घेशील
पण तुझ्या केसांवरून ओघळणारा थेंब टिपायला आता तुझ्या सोबत कोणी नसेल
बघ, माझी आठवण येते का

तुला आवडायचे पावसात कॉफी प्यायला ,
मला मात्र आवडायचे फक्त तुला बघायला
कॉफी शॉप्स अजुन चालूच आहेत,
पण आता चल ना कॉफी प्यायला असं म्हणणारे कोणी नसेल
बघ, माझी आठवण येते का

पावसात भिजताना तू चक्क लहान मुलगी व्हायचीस
पावसाचं पाणी उडवत त्यातच चालायचीस
पण असं चालताना आता तुझा हात धरून सोबत करणारं कोणी नसेल
बघ , माझी आठवण येते का !!!

- ओंकार टेंबे। #footsteps बघ, माझी आठवण येते का ?  ..... Marathi Romantic Poem  !!!!

omkartembe6565

Omkar Tembe

New Creator