त्या पाहुन बेड्या हातामधल्या आई का कोणाचेही अंतर द्रवले नाही तुज सोडविण्याचा विडा उचलला आहे हा तुझ्याचसाठी यज्ञ मांडला आहे...१ घेतली शपथ मी मुक्त तुला करण्याची अन दिली आहुती साऱ्या आयुष्याची मज विरह तुझा बघ मानवला गे नाही आणण्या परत विनविले सागरा आई...२ धाडली पिस्तुले करुन तस्करी येथे भय बाळगले ना गोऱ्यांचे मी तेथे जमवली फौज मग नवतरुणांची मोठी जे सज्ज प्राण देण्याला आईसाठी...३ अपशकुनी सन अठराशे सत्तावन्न ती स्वप्ने झाली स्वातंत्र्याची भग्न बंड ठरवुनी मग बासनात ते गेले स्वातंत्र्य समर मी पुन्हा पुढे आणियले...४ मज आस नसे बघ कुठल्याही मानाची आजन्म करावी सेवा तव चरणांची तुज स्वतंत्र करण्या झिजली काया जेव्हा मी पुत्र तुझा गे सुपुत्र ठरलो तेव्हा...५ भोगली सजा मी काळ्या पाण्याचीही ना पर्वा केली कधीच जगण्याचीही तुज मुक्त पाहुनी झालो आनंदित मी ना फिकीर केली भारतरत्नाची मी...६ ©उमा जोशी #सावरकर