शेवटी खेळ भावनांचा, काही वेळेची आपुलकी, थोडा प्रेमाचा देखावा, सगळी काही ओढाताण, फक्त वेळ निभावून नेण्याचा, शेवटी खेळ भावनांचा. काही क्षणात आकाशी झेप, स्वप्न रंगवत बसून, ध्यास भरारी घेण्याचा. पण रंगाचे बेरंग होताच, शेवटी प्रयत्न राहतो तो , धडपडत का होईना जगण्याचा. शेवटी खेळ भावनांचा. या सगळ्यातून मुक्त होता, शेवटी साठा उरतो तो फक्त आठवणींचा, जुन्या जखमा पुन्हा उकरत, नव्याने खेळ खेळतोच. पण कधी प्रयत्न नाही करत, पुढच्याला समजून घेण्याचा, शेवटी खेळ भावनांचा. #NojotoQuote