बाप माझा शेतकरी हालतीचा तोच वाली लोळतीया पीक पाण्यात लेकुरवाळी... निंदा अवघी झाली डोळ्यातच साचलेय पाण्याची तळी.. राजा होणार तो कधी काळी आज झालाय जणु तो निंदक शेतकरी.. माघार कोण घेईनासा झाला पाऊसाने बाप माझा रडवला.. तुडुंब आहेत विहीरी अजुन नावाचा राजा राहीला काळ्याआईची माया समजणारा रडत बसला.. दोन घास पोटाचे रडके झालेत जसे.. चोरले नियतीने माझे आईचे सोने.. समजत का नाही कोणाला अन्नदाताच निवांत पडला.. डोळे झाकुण गातोय मनाच्या रडक्या वेदना.. गुळवणी झालं वावरात सारं सारं पिकं पाण्यात लोळतयं रडक्या मनाला कोण देईलं जगण्याचा सहारा.. अन्नदाता संकटात आज सारा पुरलेला कोण देईल खांदा त्याला.. रडके बोल सारे माझ्या बळीराज्याचे का ऐकाया येईना कोण्या.. शेतकरी होईल कसा राजा? रान आता नही म्हणतयं पिकाला सहारा ऊपळटले वावर सारे नका सांगु कोणी आता आम्हाला.. भक्कम राहिल किती दिवस आता पोकळ खांब जीवाचा.. डोळ्यांनी पहातोय दुर्दशा मी शेतकरी पोरगा.... 🙏🙏 शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे आज निसर्गाशी भिडतोय शेतकरी... #आजनिसर्गाशीभिडतोयशेतकरी हा विषय शब्दसखी🖊️ यांचा आहे. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine