एखादी व्यक्ती जेव्हा आपली सवय होवून जाते, त्याच्या बोलण्याची, वागण्याची, बघण्याची आणि सहवासाची, तेव्हा त्याची सवय विसरणं खूप अवघड असतं ना.. नको तेव्हा त्या व्यक्तीच्या msg, call ची वाट बघणं, हाच नित्यक्रम बनतो आपला. कारण, आपल्या हृदयातील त्या व्यक्तीचं स्थान रिक्त करणं खूप कठीण असतं.. त्या व्यक्तीला विसरणं कठीणच असतं, त्या व्यक्तीला न बघता राहणं कठीण असतं, ती व्यक्ती नकळत हृदयाच्या कोपऱ्यात इतक्या खोलवर गेलेली असते, की, तिथून काढणं कठीण असतं.. तेव्हा नाही थांबवू शकत स्वतःला त्या आठवणीत कविता करणं.. खूप अवघड असते ही सवय तोडणं, नाही जमत विरहात जगणं.... प्रीत (प्रीत )🙏