Nojoto: Largest Storytelling Platform
kumarchitraprodu1534
  • 55Stories
  • 23Followers
  • 603Love
    497Views

Kumarchitra

Storyteller

  • Popular
  • Latest
  • Video
3c1c7255340e52ab1819e5f31a2ff684

Kumarchitra

रोज पहाटे 
मी तुझा चेहरा शोधत असतो
गोंधळलेल्या आयुष्यात 
तुझे प्रेम फक्त जाणवत राहते
त्या कळसाच्याच उंचीने!

आजच्या कलियुगात
तुझी ती कृपा
मनाची सगळी जळमट वाहून नेते
इंद्रायणीसारखीच!

प्रत्येक शांततेच्या क्षणी 
तुझे शब्द फक्त येतात कानी
हे विठ्ठला, तुझ्या सानिध्याने
या जगातल्या कोणाचाही 
आत्मा परिपूर्ण होऊच शकतो!

~ कुमार भोसले
    जुलै २४, आषाढी

©Kumarchitra #Vithal
3c1c7255340e52ab1819e5f31a2ff684

Kumarchitra

© kumarchitra

©Kumarchitra
  #temple
3c1c7255340e52ab1819e5f31a2ff684

Kumarchitra

स्वयंचारित्र्यसत्यवचनमर्यादापुरुषोत्तम
कुशल प्रशासक
रावण संहारक 
..प्रभू श्रीरामची एक

काव्यगतशिल्पगतचित्रगतभूमिगत 
बहुविध स्वरूपात 
प्रकटित राम
..या सम हाच!




श्रीरामनवमीच्या शुभेच्छा!!

©Kumarchitra #ramnavmi #kumarchitra
3c1c7255340e52ab1819e5f31a2ff684

Kumarchitra

पाय रोवूनी संकटांवरी खडा
तो शिवपुत्र शंभूराजा छावा||

कधी कोणती मोहीम अपयशी ना जाहली
अशी पराक्रमकिर्ती उभ्या जगाने पाहिली||

धुरा स्वराज्याची त्यांनी सांभाळली सक्षम
जन-मनांत छत्रपतीमुद्रा राहील अक्षय||

अचाट धैर्य
अजोड पराक्रम
असमान्य शौर्य
प्रयत्नांची पराकाष्ठा
बहुभाषांवर प्रभुत्व
संस्कृत पंडित
धर्माभिमानी
व्यासंगी
आदर्श महावीर
श्री छत्रपती संभाजी महाराज
पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!!










~ कुमार भोसले

©Kumarchitra #शंभूराजे
3c1c7255340e52ab1819e5f31a2ff684

Kumarchitra

अस्तित्व टिकवून ठेवण्याचा लढा आपल्यासमोर नाहीये
पण अस्तित्वात असल्याचे दाखले मात्र वेळोवेळी द्यावेच लागतील!

जुन्या वर्षातील चुकांना सावरत आज 
देवू नव-वर्षातील संकल्पांना गुढीची साज

नव-वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!

©Kumarchitra
  नववर्ष #अस्तित्व
3c1c7255340e52ab1819e5f31a2ff684

Kumarchitra

ऐलतीर सोडला होता 
होडीभर स्वप्नं घेऊन
नदी होती सोबतीला
जशी गावासाठी होते नेहमीच!
 ..अजून एक नदी होती 
उभी किनाऱ्याला 
डोळे भरले पाणी घेऊन
सुरू झाला होता प्रवास 
पैलतीराकडे..!!

©Kumarchitra ऐलतीर - पैलतीर
#river

ऐलतीर - पैलतीर #river #मराठीकविता

3c1c7255340e52ab1819e5f31a2ff684

Kumarchitra

तू मानतेस ना 
मला तुझा चंद्र 
रोजच पोर्णिमेइतक्या 
प्रेमाची अपेक्षा ती कशाला
चंद्राच्या कलेप्रमाणेच
भासेल तुला 
आपल्या प्रेमाविषयी

अगं तुझा चंद्र 
पोर्णिमेइतकाच असतो 
नेहमीच 
पण त्याच्या जबाबदऱ्यांमुळे 
तुला भासेल तो कमी जास्त
मात्र तो भासच असतो
हे तू विसरू नको 

अमावस्याला तो नाही 
म्हणून एकटं वाटून घेऊ नको 
तो एक दिवसच त्याच प्रेम आठवून बघ 
तो दुसऱ्याच रात्रीला 
तुझ्या सोबत 
तुझ्या कुशीत असेल

©Kumarchitra #yourmoon

#TakeMeToTheMoon
3c1c7255340e52ab1819e5f31a2ff684

Kumarchitra

सगळेच खाण्यात गुंग होऊन
जेवणाचा आनंद घेत असताना 
तिने रिकाम्या होणाऱ्या 
टोपल्याकडे पाहत 
हळूच तिच्या ताटातली 
अर्धी भाकरी 
टोपल्यात टाकली..

#आई

©Kumarchitra #आई #Mother
3c1c7255340e52ab1819e5f31a2ff684

Kumarchitra

तू थकत नाहीस का रे 
रोज अंधाराशी लढताना
रात्रंरात्र जागूनसुद्धा
दिवसा सोबत करतोस धरणीला
तुम्ही दोघं माय - बाप
उपसत राहता कष्ट जन्मभर
आम्हा लेकरांना जगवायला
मग आम्हीच का चुकतो 
कणभर परतफेड करण्याला

©Kumarchitra #Sunandearth
3c1c7255340e52ab1819e5f31a2ff684

Kumarchitra

यावर्षी  ऊन  जरा  जास्तचंय  ना..
यावर्षी  थंडी  काय  बोलूच  देत  न्हाय..
आणि  हा  पाऊस  तर  कधीही  पडतोय..
साला  ग्लोबल वॉर्मिंगचा  विचार  कोण  करतोय..?

©Kumarchitra #globalwarming
loader
Home
Explore
Events
Notification
Profile