Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser2767779309
  • 115Stories
  • 38Followers
  • 1.4KLove
    6.5KViews

गोरक्ष अशोक उंबरकर

  • Popular
  • Latest
  • Video
6a7ab2a64a26475399b4b5df60420836

गोरक्ष अशोक उंबरकर

White सुख शोधायला म्हणून माझे 
पाय शहराकडे वळले..
सुख हे गावीच होते 
 हे जरा मला उशिराच कळले..

स्वप्न रोज बघताना 
शहरांनी खूप छळले..
इतकं छळून सुद्धा माझे 
आयुष्य इथेच रुळले..

रुळल जरी आयुष्य माझं 
पण समाधान नाही मिळले..
नोकरी पगार असून सुध्दा 
निवांत क्षण मी गिळले..

निवांत क्षण मी गिळले..

©गोरक्ष अशोक उंबरकर
  गावं
6a7ab2a64a26475399b4b5df60420836

गोरक्ष अशोक उंबरकर

White स्वप्ना मागे पळताना 
माझ्यात मी हरवलो..
हरवताना जगात या 
स्वतःच मी  दुरावलो..

जबाबदारीच्या ओझ्याने 
अगदीच मी भारावलो..
भारावलेल्या आयुष्याला
जगायलाच मी विसरलो ..

 उगाच का बरं पळतोय 
अजूनहि नाही समजलो..
एकवेळ समजलं गेलं मला 
पण तरीही नाही थांबलो..?

पण तरीही नाही थांबलो..?

©गोरक्ष अशोक उंबरकर
  तरीहि नाही थांबलो

तरीहि नाही थांबलो #मराठीकविता

6a7ab2a64a26475399b4b5df60420836

गोरक्ष अशोक उंबरकर

ये बाळा जेवलास का?
हे विचारायचं ती विसरत नाही...
विसरलं जरी कोणी कधी
मग आईचं आईपण दिसत नाही..

एकदा नव्हे दहा वेळा
जेवून घे म्हणून थकत नाही..
आई असल्यावर घरी 
 उपाशी कुणी झोपत नाही..

रांधा वाडा उष्टी काढा
तरीही आई काय करत नाही..
खरं म्हणजे तिच्याविना
घरातलं पान ही हालत नाही..

आजवर कधी उपाशी मात्र 
स्वप्नात सुद्धा झोपलो नाही..
समोर सगळं असूनही आज
साधं पोटभर जेवू शकलो नाही..

©गोरक्ष अशोक उंबरकर
  #MothersDay
6a7ab2a64a26475399b4b5df60420836

गोरक्ष अशोक उंबरकर

White सप्टेंबर ची ५ तारीख 
शिक्षक दिन असायचा..
शिक्षक सारे असून ही 
वर्गात कोणीही नसायचा..

पोरा पोरींच्या मेळ्यातून
कोणी तरी निवडायचा..
 हिंदी, मराठी, गणितं असं 
प्रत्येक विषय शिकवायचा..

शिकवताना सर् मॅडम
यांनी रंगीत ड्रेस घालायचा..
वेगळा विलक्षण क्षण 
जणू असाच तो वाटायचा..

विषय निवडलेला शिक्षक
खूप टेन्शन मध्ये असायचा..
कारण पहिल्यांदा तो
शिक्षक साऱ्यांचा बनायचा..

शिक्षक साऱ्यांचा बनायचा..

©गोरक्ष अशोक उंबरकर
  #teachers_day
6a7ab2a64a26475399b4b5df60420836

गोरक्ष अशोक उंबरकर

जीवनाच्या धावपळीत
 काही ना काही हवंय..
स्वतः कडे नाही ते
सगळं काही नवय..

नाही ते मिळवताना
का आपण पळतोय..
पळून पळून जगताना 
जीव मात्र जाळतोय..

गरजेला मागे सारून
अपेक्षे प्रमाणे वागतोय..
एक झाली की नवीन
जणू मशीन गत जगतोय..

©गोरक्ष अशोक उंबरकर
  जगणं
6a7ab2a64a26475399b4b5df60420836

गोरक्ष अशोक उंबरकर

White घरात आलेल्या 20-22 वर्षाच्या  सूनेकडून
  50 वर्षाच्या बाई सारख्या वागणुकीची
 अपेक्षा करू नका ...

तसेच....

25-26 वर्षाच्या मुलाकडून
 गाडी ,बंगला, फ्लॅट, कायमस्वरूपी नोकरी,आणि
 चार चाकीची अपेक्षा धरू नका ..

©गोरक्ष अशोक उंबरकर
  वास्तविक

वास्तविक #मराठीकविता

6a7ab2a64a26475399b4b5df60420836

गोरक्ष अशोक उंबरकर


कधी कोपर्डी कधी दिल्ली
कोलकत्त्याची ही न्युज आली...
कुणाची आई कुणाची बहीण 
  आज पुन्हा शिकार झाली..

कधी बाळ कधी बाई
तर कधी ताई जीवाशी मेली..
मरताना ती माय माऊली
तडफडतच हो गेली..

पेटवताना मेणबत्ती
शहरेही बंद झाली..
मरण पावलेली जिवंत कधी
 एकदाही नाही आली..

गुन्हेगाराला जिवंत जाळा
अस म्हणेल का कोणी काही..?
जिवंत जाळायलां असा 
अजून कायदाच बनला नाही..

अजून कायदाच बनला नाही..

©गोरक्ष अशोक उंबरकर
  बलात्कार

बलात्कार #मराठीकविता

6a7ab2a64a26475399b4b5df60420836

गोरक्ष अशोक उंबरकर

तू असताना जवळ
नकोसा वाटला पसारा..
तू नसताना जवळ
 आठवणींचा दाटला सहारा..  

उजाडलेली सकाळ
अन्  हा उनाड वारा..
तू नसताना जवळ 
आसवांच्या मंद मंद धारा..

तू असताना जवळ
तुझाच असतो दरारा..
तू नसताना जवळ
ना शब्दांचा कुठला नारा...

ना शब्दांचा कुठला नारा..

©गोरक्ष अशोक उंबरकर
  mi आठवण
6a7ab2a64a26475399b4b5df60420836

गोरक्ष अशोक उंबरकर

हळूहळू आता कळतंय 
बाप सणासुदीला कुठं जायचा.. ?
थकून भागून आल्यावर सुद्धा
 माझ्याकड हसून पाहायचा...

हळूहळू आता कळतय
बाप शिळ्या भाकरीला का खायचा..?
भूक असली तरी त्याला
न जेवता ढेकर यायचा ..

हळूहळू आता कळतंय
बाप फाटक्या सदऱ्यात का दिसायचा..?
माझ्या शाळेची खाकी बघूनच
तो सहज खुश व्हायचा...

हळूहळू आता कळतंय
बाप दवाखाण्यात का नाही जायचा..?
जबाबदारीच्या ओझ्याणं
बाप माझा बरा व्हायचा..

बाप माझा बरा व्हायचा..

©गोरक्ष अशोक उंबरकर
  baap
6a7ab2a64a26475399b4b5df60420836

गोरक्ष अशोक उंबरकर

हळूहळू आता कळतंय 
बाप सणासुदीला कुठं जायचा.. ?
थकून भागून आल्यावर सुद्धा
 माझ्याकड हसून पाहायचा...

हळूहळू आता कळतय
बाप शिळ्या भाकरीला का खायचा..?
भूक असली तरी त्याला
न जेवता ढेकर यायचा ..

हळूहळू आता कळतंय
बाप फाटक्या सदऱ्यात का दिसायचा..?
माझ्या शाळेची खाकी बघूनच
तो सहज खुश व्हायचा...

हळूहळू आता कळतंय
बाप दवाखाण्यात का नाही जायचा..?
जबाबदारीच्या ओझ्याणं
बाप माझा बरा व्हायचा..

बाप माझा बरा व्हायचा..

©गोरक्ष अशोक उंबरकर बाप
loader
Home
Explore
Events
Notification
Profile