Nojoto: Largest Storytelling Platform
gillssupervisors5156
  • 6Stories
  • 7Followers
  • 50Love
    1.5KViews

कवी. शशि शिनगारे

कविता गाणी कथा आणि बरंच काही

  • Popular
  • Latest
  • Video
6d01fdde3bf0056c52fe7b34cedc7ac8

कवी. शशि शिनगारे

तू गरिबांचा वाली 
म्हणून तुला डोक्यावर घेऊन
उध उध करणाऱ्या गरिबांचा 
तू आता राहिला नाहीस देवा 

तुझे नोकर जे तुझ्या
 आणि आमच्या मध्ये 
शेंडी आडवी टाकून 
तुझी दारं फक्त पैसा दिल्यावरच
उघडतात 

घामाच्या कमाईचा नारळ 
जेंव्हा तुझ्यासाठी फोडायला 
जातो 
तेंव्हा आमचाच नारळ
आम्हालाच फोडून देण्यासाठी
दक्षिणा देऊन त्या नारळाची
जप्ती सोडवावी लागते

ते नारळ फोडे दक्षिणे शिवाय 
आमच्याच नारळाचे तुकडे 
धड तुला ना मला करून 
हुसकून देतात 
अशी तुझी सेवा आणि 
भक्तांच काम सोपं करतात 

वाईट एवढंच वाटतं की तू आता 
गरिबांचा राहिला नाहीस 
तुला ही सवय लागलीय नोटांचे 
ढीग गोळा करायची 
तू त्यांच्यातलाच एक आहेस 
श्रीमंत
 मजेत राहा तू 
आम्ही दारावरूनच तुझी 
मजा बघू 
बघे म्हणून ......
                       कवी. शशिकांत शिनगारे

©कवी. शशि शिनगारे
  श्रीमंत देवा

श्रीमंत देवा #मराठीसंस्कृति

6d01fdde3bf0056c52fe7b34cedc7ac8

कवी. शशि शिनगारे

मी उगाच माझी स्वप्ने तुडवीत
चालत आहे वाट
चढत आहे आयुष्याचे
 घाटावरती घाट 
 आस मनाला एकच
होती
यश घेऊन येईल पहाट

सरता सरेना रात काळी
मेहनत काळ्या रंगाची
जगत आहे आज जिदगी 
फुटक्या रंगीत ढंगाची

पैसा जैसा वैरी झाला
मिळेच ना तो मला
खस्ता ठेचा खाऊन रक्त
वाहिले जिंदगी तुला 

खेळ माझा खेळत राहील 
जरी मी हरलो किती 
धमक ठेवतो मनगटात या 
जिंकीन तुला जिंदगी 
तुझी न मजला भिती

©कवी. शशि शिनगारे
  जिंदगी मी तुला भित नाही

जिंदगी मी तुला भित नाही #जीवनअनुभव

6d01fdde3bf0056c52fe7b34cedc7ac8

कवी. शशि शिनगारे

तुझं गोड हसणं 
त्यात ओठावर तीळ असणं 
बोलके डोळे  
तुला घडवणाऱ्या त्या मूर्तिकाराला 
कसं काय सुचलं असेल 
की तू 
 एकटीच  सगळ्यांन 
पेक्षा वेगळी आणि सुंदर दिसेल
म्हणून तुला  कधीही न काढता येणाऱ्या 
नैसर्गिक आभूषणांनी  मढवल असेल


                            ,,,, शशि शिनगारे

©कवी. शशि शिनगारे
  तुझं गोड हसणं

तुझं गोड हसणं #मराठीकविता

6d01fdde3bf0056c52fe7b34cedc7ac8

कवी. शशि शिनगारे

चमत्कार दाखवून नमस्कार प्राप्त करणाऱ्यांसाठी

चमत्कार दाखवून नमस्कार प्राप्त करणाऱ्यांसाठी #मराठीकविता

6d01fdde3bf0056c52fe7b34cedc7ac8

कवी. शशि शिनगारे

टायटल तुम्ही सुचवा कॉमेंट मध्ये

टायटल तुम्ही सुचवा कॉमेंट मध्ये #मराठीकविता

6d01fdde3bf0056c52fe7b34cedc7ac8

कवी. शशि शिनगारे

मंदिराची पायरी भगवंताला काय म्हणत आहे एक छोटीशी कविता आवडल्यास शेअर आणि फॉलो करायला विसरू नका

मंदिराची पायरी भगवंताला काय म्हणत आहे एक छोटीशी कविता आवडल्यास शेअर आणि फॉलो करायला विसरू नका #मराठीकविता


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile