Nojoto: Largest Storytelling Platform

Best लेखणीचाबाजार Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best लेखणीचाबाजार Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories

Deep Bawara

#FourLinePoetry नाराज का व्हावे मी तुझा तो धंधाच आहे 
बाजार पडता हंगामा दलाल साला मंदाच आहे

कमावलेस किती तू भांडणे लावून लोकांची
जाहिरातीचा भडीमार इंतजाम तगडाच आहे

 केलीस तू मानवी हक्काची पायमल्ली
मेल्या भावना तुझ्या वाया क्यू टीम मुर्दाच आहे

आता कुठे होते बात इमानदारीची
भरल्या बाजारी जरुरी नफाच आहे

करुनी लेखणीचा अपमान मांडला बाजार
मुर्द्याच्या शहरात लेखणी मुर्दाच आहे

आहे फौज मोठी लिस्ट मोठं मोठ्या नावाची
सडलेल्या मेंदूची किंमत मात्र खुर्दाच आहे 

खोटारड्या लोकांचा भाडीमार तिथे
पैशा साठी हवे ते छापणे त्यांचा धंदाच आहे

झाली आता "दीप" गर्दी अशा लोकांची
भेटेल त्यात खरा कोणी वांदाच आहे धंधाच आहे...

©Deep Bawara #मराठी #मराठीगजल #yqdidi #yqtaai #धंधा #लेखणीचाबाजार


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile