Find the Best होडी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about होडी meaning in hindi, होडी meaning in english, होडी meaning in marathi, होळी मराठी कविता, होडी समानार्थी शब्द,
Ganesh Shinde
"आठवतंय का तुला..." आठवतेय का ती संध्याकाळ, तू आणि मी , एकटेच होतो... त्या समुद्राच्या पाण्यात... शांत उदास अस्थिर होतो... मग आलेली ती होडी, सख्याच्या ओढीने धावत, दुरवर च्या ठिपक्या पासून, एक मोठा आकार होत ... होडीच्या जोराने आलेली लाट, तुझा गेलेला तोल त्या क्षणात, तुझी माझी नजरानजर ती, आणि तुला सावरणारे माझे हात, तुला आठवतं का ग हे सगळं, आपलं नातं ही असंच होतं ना, दूरदेशीची दोन ठिपके होतो ना, तुझं तू माझं मी थोडं परकं होतं ना, त्या होडीने त्या समुद्राने त्या लाटेने, असे काही बांधले त्या दिवशी, हात गुंफले ते सप्तपदी झाले , आता तू मजसमीप दर दिवशी... किनाऱ्यासारखा स्थिरावलेलो मी, आणि तू लाटे सारखी अवखळ, एका होडी मुळे आलेलो जवळ, सांग ना, आठवतं का ग तुला हे सगळं... तू... मी... तो समुद्र... ती होडी... #लाट #प्रेम #होडी #love #sea #wave #boat #yq_gns
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited