Nojoto: Largest Storytelling Platform

ऑडिओ- उपक्रम अभंग -४ ( एकादशी) ज्ञानीयाची वाणी॥

 ऑडिओ- उपक्रम 
अभंग -४ ( एकादशी)
ज्ञानीयाची वाणी॥ आणा आचरणी ॥
आनंद गगनी ॥ धावघेई॥१॥

मनन चिंतन ॥ अध्याय प्रत्येक ॥
पान ऐकऐक॥ करा नित्य॥२॥

मराठीची जाण ॥ भाषेचा सन्मान ॥
बाळगुया मान ॥ सदा मनी॥३॥

आज एकादशी ॥ उद्याची द्वादशी ॥
 पुजुया तुळशी ॥ आज उद्या॥४॥

मोहन सोमलकर नागपुर

©Mohan Somalkar
  # अभंग

# अभंग #मराठीकविता

37 Views