Find the Latest Status about भटकंती कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भटकंती कविता.
Shivraj Andurkar
भटकंती कविता.... . लाईक comment share . #myvoice #kavita #Life #Motivation #truefeeling #Broken #Talk
read morevaishali
🌹 भटकंती 🌹 आज इथे तर उद्या तिथे भटकंती आमची सुरू पोटासाठी आम्ही मिळेल ते काम करू जमीन आमुची गादी आकाश आमचे छप्पर वणवण फिरतो कामासाठी देत नशिबाशी टक्कर डोईवर असतो नेहमी बोचक्यांचा भार रस्त्याच्या कडेलाच थाटतो आम्ही संसार मुक्या प्राण्यांची संगत असे खूप आधार त्याच्या जीवावर आमचा सुरू असे कारभार भूक लागताच तान्हुले बाळ आईच्या कुशीत शिरते तीन दगडांच्या चुलीवर आमचे सारे जीवन सरते भटकंती#मराठी कविता
भटकंतीमराठी कविता
read morepooja d
भटके लोक आम्ही, भटकंती आमचा व्यवसाय हे नशिबी आमच्या लिहिलं हाय ।। मेंढरं, घोड घ्यायची नि भटकायचं हे गाव नि ते गाव पर भाऊ, आमची दशा आम्हालाच माहीत हाय ।। ना आमचा असतो ठिकाणा, ना कोणता पत्ता आज इथं तर उद्या कुठं ह्याचा ना लागतो थांग पत्ता ।। तरी बी आमची कोणती तक्रार नाय,, एकच म्हणणं, तुम्ही आम्हा 'धनगरां' सोबत जे वागता ते बर नाय ।। येतो आम्ही दोन दिस तुमच्या गावा फक्त तेवढं आम्हाला सुखाने राहू देत जावा ।। आज असती आमची ' राणी अहिल्याबाई' तिनं अस गावोगाव कधी फिरू दिल नसत, बाई ।। आम्ही आहोत माणसं दादा, एवढं ठेवा ध्यानात पुढल्या वेळेला येईन तेव्हा आमच्यासाठी जागा ठेवा तुमच्या मनात ।। स्वाभिमान आमचा अजून हाय जागा उगी लागत नाही आम्ही कुणाच्या बी मागा ।। - ©✍️ पूजा डोमाळे (राणू) #कविता #धनगर #भटकंती #yqmarathi
#कविता #धनगर #भटकंती #yqmarathi
read moreKunal Salve
तुझ्यात घे सामावून मला नकोसा हा आता दुरावा वाटतो जीव जाईल माझा तुला न्याहाळताना मना रे भटकंती विषय चांगला नसतो ! #pc : Instagram मनाची भटकंती तुझ्याच दिसण्यानं 😍🤗
#pc : Instagram मनाची भटकंती तुझ्याच दिसण्यानं 😍🤗
read morerayansh
आयुष्याच्या बरणीत प्रेमाचं लोणचं कितीही आंबट असलं तरी सुटतं पाणी तोंडच ताटाच्या कोपऱ्यात स्थान त्याचं, छोट्याश्या जागेचं शिवाय ज्याच्या पंचपक्वान्न कसं पूर्ण व्हायचं प्रेमाचंही तसंच मनाच्या कोपऱ्यात अंकुर छोटंसं आंबट गोड चव मुरांब्याची चाखल्यावाचून नाही राहायची उत्तरायणात खट्टा मिठा पाहिजे त्यातच मजा साथ जगण्याची थोड्याश्या चवीनं पंचपक्वान्न संपूर्ण होतं तसंच काहीसं प्रेम ज्याने आयुष्याला पूर्णत्व येतं कालांतराने बरणी रिकामी होतं जाते त्यात मुरांब्याची भर घातली पाहिजे प्रेमाचं आयुष्य कमी होताना जाणवलं की आयुष्यातलं प्रेम खुलवता आलं पाहिजे #rayofhope #मुरांबा #उत्तरायण #rayofhope #मुरांबा #उत्तरायण #भटकंती #Life #ek_tyancha_unaad_divas_ #aaipappa #livelong_forever_together #happily_ever_after❤️😍💞
#rayofhope #मुरांबा #उत्तरायण #भटकंती #Life #ek_tyancha_unaad_divas_ #aaipappa #livelong_forever_together happily_ever_after❤️😍💞
read more