Nojoto: Largest Storytelling Platform

Best चित्रकविता Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best चित्रकविता Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories

Archana Deshpande-Pol

चित्रामधूनी दिसतो आहे रस्ता  केविलवाणा
रयाच गेली भग्न जाहल्या साऱ्या पाऊलखुणा
बंद वाहने, बंद दुकाने कळकटलेल्या भिंती.
फलकांवरती नाव पुसटसे काजळलेली
बत्ती.

कचराकुंडी विखुरलेली रस्त्यावरती साऱ्या
धुळ वेढूनी बसला आहे सारा रंग पसारा
धुरकटलेल्या तारांवरती घुसमटलेला वारा
 काळोख्या रात्रीस वेढतो शांत मग्न पहारा

भयाण गल्ल्या, भकास रस्ते भीषण दिसते सारे
सुन्न कोरड्या आकाशातून मावळलेले तारे
जागोजागी विखुरलेली ओंगळवाणी नक्षी
धूसरलेले भयाण सारे भेदरलेले पक्षी

गूढ शांतता नांदत आहे मनामनातुन येथे
भुतकाळाच्या आठवणींशी जोडत जाते नाते
उध्वस्थ मने, उध्वस्थ चरे, उध्वस्थ पोकळी आहे
चित्रामध्ये वसणारे ते शहर हरवले आहे.

रंग फिकूटले, नभ कोंदटले तरी उजळते आहे
उगवत्या सुर्यास उद्याचे दान मागते आहे.

अर्चू.. #चित्रकविता

Dinesh Chaudhari

#चित्रकविता...


डोईवर संसाराचा सुर्य घेतला निखारा,
तरी गालात रे हसु त्यास तुझाच सहारा.
दिस येतील जातील खेळ उन्ह-सावलीचा,
बाळा नको तु भिऊस तु बी लखलखत्या तेजाचा.
आज घेतलं मी उन्हं उद्या छत्रछाया तुझी,
बाळा शिकुन मोठा व्हयं पाटी अडाणी रे माझी.
माय तुझी मी दयाळु तुला लावते रे जीव,
बाप तुझा रे कष्टाळु जरा उपकार ठेव.
आम्हा दोघांसाठी बाळा तुच आहे तेज-तारा,
तुझ्या तेजाच्याही पुढे सुर्य वाटतो अधुरा.
डोईवर संसाराचा सुर्य घेतला निखारा,
तरी गालात रे हसु त्यास तुझाच सहारा.

©Dinesh Chaudhari


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile