Nojoto: Largest Storytelling Platform

Best पाऊस_आणि_प्रेम Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best पाऊस_आणि_प्रेम Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 4 Stories

शब्दवेडा किशोर

#माझ्या मनातले कळत नाही....
हा आजकालचा पाऊस सायंकाळ शिवाय पडत नाही
तिच्या मनातले बहुतेक कळते त्याला पण माझ्या मनातले कळत नाही......
दुपारच्या उन्हात सावली कालवून बनवावे वाटते सुगंधी स्वप्नं
अशात ती माझ्या सोबत असताना तिने रहावे मिठीत मग्न
कोरत रहावी मी धुंदीची कविता स्पर्शाच्या बोरूने तिच्या मुलयम त्या हातावर
अन् पावसाच्या चाहुलीने तिने ओठ टेकवावे माझ्या ओठांवर
पण नेमकाच साला हा पाऊस मिठी असताना कोसळत नाही
तिच्या मनातले कळते त्याला पण माझ्या मनातले कळत नाही......
पेरणी बिरणी ठीक आहे राव पण जोडप्यांचाही विचार करावा त्याने
दोनच रोपटी असली जरी रानात थोडं का होईना झिरपावं त्याने
पाऊस पडायला लागला रे लागला की ती माझ्यात वितळायला लागते
अन् तिच्या देहाची कस्तुरीसुद्धा हवेत छान दरवळायला लागते
पण बरोबर अशाच वेळी हा पाऊस माझी प्रार्थना ऐकत नाही
तिच्या मनातले कळते त्याला पण माझ्या मनातले कळत नाही......
चिखल होतो पाणी साचते तिच्या पायातले पैंजण वाजते
पावसात भिजताना पदर उडतो मग ती कसली सॉलिड लाजते 
तिच्यावरला सारा पाऊस मला अंगावर घ्यायचा असतो म्हणून
भेटल्यावर रोज दुपारी पावसाला मी ये रे पावसा म्हणतो
पण या भाऊला नेमक्या वेळी माझी तगमग दिसत नाही
तिच्या मनातले कळते त्याला पण माझ्या मनातले कळत नाही......
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #पाऊस_आणि_प्रेम

Shankar Kamble

सये सर पावसाची आली अवचित आज
मृदूगंध शहारतो नव्या नवतीचा बाज

थेंब टपोरी, बिलोरी घर ,आंगण भिजले
नक्षी माळता मोत्यांचे देह तरुंचे सजले

शीरशीर अलवार काटा फुटतो कोवळा
बीजं रुजता मातीत सुखं स्वप्नांचा सोहळा

देह, गात्रांत साठवं ओल  मनांच्या तळाशी
श्वास श्वासांत भारता लाट पारखी जळाशी

मोर पिसारा फुलता डोळे भरले नभाचे
शुभ्र कोंदण लाभले दान पावले मनाचे

घेई भरून ओंजळ खोल भिजू दे पाऊस
पाठशिवणीचा खेळ नको परत जाऊस

©Shankar Kamble #zindagikerang #पाऊस #पाऊसधारा #पाऊसाततुझीआठवण #पाऊसाला #सर #धारा #पाऊस_आणि_आठवण #पाऊसआला #पाऊस_आणि_प्रेम

MEERA

pooja d

#पाऊस #पाऊस_आणि_प्रेम #पाऊस_आणि_कविता #सुख सहजसुचल म्हणून लिहिलं.....

read more
तो, मी अन रिमझिम पडणारा पाऊस
त्याच्यासोबत चिंब भिजण्याची फिटली हौस,
त्याच्या ओल्या मिठीची छत्री त्याने केली
मला सुखावण्यासाठी त्याने रात्र थांबवली...... #पाऊस #पाऊस_आणि_प्रेम #पाऊस_आणि_कविता #सुख 
सहजसुचल म्हणून लिहिलं.....


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile