Find the Best वाटते Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about सैन्यात का जावेसे वाटते, वाटते का, आमदार जलेसर का वाटते, का वाटते, भिती का वाटते,
Shankar Kamble
शोधून सापडेना ही वाट हरवली जेंव्हा परतुन पावलांचा कुणी माग काढतो तेंव्हा.. थबकून तळ्याच्या काठी का पूर आसवे ढाळी? गर्भार सावल्या पंक्ती लेणे मिरवती कपाळी.. पाचूने जडले होते मोहरले पान दवाचे दैवात अवेळी सुकणे बोचते शल्य कशाचे? सांधला बांध मनाचा स्पुंदतो श्रावण डोळा कुरतडले कोंब कधीचे तरतरला खोल उमाळा.. हळूवार घालते साद दूरदेशी रुसला रावा पंख यावे मजं भाबडी गंध रातराणी न्यावा.. निसटून चालले श्वास राहिले भास कोरडे वळीवाच्या चार सरींना रान आतुर का एवढे? ©Shankar Kamble #Alive #वाट #वाटते #भास #सखी #भाव #देह #लाज #प्रेम
sandeep wagh
नाही बोलायचं ठरवलं,तरी पण... रोज रोज बोलावंसं च वाटत...... काय आहे तुझ माझ नात....... खरच..मलाच कळत नसत....! sandeep wagh #ठरवल्यावर #पण #तुलाच #बोलावं #वाटते #मन #Confusion
#ठरवल्यावर #पण #तुलाच #बोलावं #वाटते #मन #Confusion #Life_experience
read moreपरिलोक
नको वाटते असे तुझे पुन्हां पुन्हां बरसणे, त्या बहराने मोहरणे आता झेपणे नाही... नको वाटते शृंगाराने तुझिया लुब्ध होणे, उपासक तव रूपाचा होणे आता जमणे नाही... नको वाटते मजवरी तव धारांनी बरसणे, पावसाशी सलगी करणे आता सोसणे नाही... नको वाटते तुझे माझ्यासाठी हार मानणे, खोटा खोटा खेळ जिंकणे आता भुलणे नाही... नको वाटते प्रेमाचे हे बंध विसरूनी जाणे, नजरेत मीच माझ्या गवसणे आता होणे नाही... #love
SK
तुझी इतकी सवय झाली आहे की ते समजतं अन उमजत नाही गं मला तुझे बोलणं हवंहवंसं वाटते तुझ्या आठवणीनं मन अनं हृदय व्याकुळ होते थोडं का होईना तू माझ्याशी बोलतेस असे वाटते हृदयापासून एखादी तरी हाक मारतेस, कितीतरी मनाला सावरतोय पण आवरताच येत नाही मला... काय करु तुझी एवढी सवयचं झालीयं, मन कधींच तुझं होऊन गेलंय हे कळलंच नाही गं मला.. मी तुझा कोण आहे का नाही माहीत मला माझ्यासाठी तू सर्वस्व आहेस वचन देतो तुला विश्वास ठेव किंवा नको पण भविष्यात खुश ठेवेन तुला कारण तुझ्याचं हृदयात अडकलयं मन अनं माझ्या दिलाची धडधड आहेस फक्त तू अनं तूच.... कारण तुझी इतकी सवय झालीय गं... Love😍
Love😍 #poem
read moreनिखिल वेल्हाळ
मला वाटते आहे जे,ते तुला वाटते आहे का.? तुझ्या तिथेही सावलीविना ऊन एकटे आहे का.? ~निखिल~
निखिल वेल्हाळ
मला वाटते आहे जे जे तुला वाटते आहे का.? तुझ्या तिथेही सावलीविना ऊन एकटे आहे का.? ~निखिल~
Anurakti Padalkar
सागरास काय सांगाव्या भावना, त्यास अथांग दिसण्यात मोठे पणा. पण भीती वाटते त्याची... जाऊन रडावे वाटते त्याच्यापाशी पण त्याच्या सारखाच माझ्या अश्रूतही खारेपणा अनु मी Anu mi##
Anu mi## #Quote
read moreAmit Rawool
असे वाटते...... असे वाटते एकदा माणूस म्हणून जगून पहावे😇 दुसऱ्याच्या सुखाचे कारण बनून जगावे😊 असे वाटते एकदा झाड़ बणुन जगता यावे🌳 स्वतः घाव सोसुन कामी दुसऱ्याच्या यावे😇 असे वाटते एकदा पाऊस म्हणून बरसावे🌦 अलगद शेतकऱ्याच्या ओठांवरच हसू बनून जावे😊 असे वाटते एकदा पुस्तक म्हणून जगावे📚 ज्ञानाचा निर्मळ जरा बनून पुढे चालत राहावे🌊 असे वाटते एकदा लेखनी बनून जावे✒ भावनांच्या कवितेत शब्द म्हणून उतरावे📝 असे वाटते एकदा मन म्हणून जगावे❤ क्षणात सारे जग कवेत घ्यावे...🌍 ✒/-अमित भिकाजी राऊळ.
Sagar Anant Jog
"रोज रात्री पपांना मी मम्मी वाटते" तुमची मुलगी असूनही ही भीती का माहिती मला का वाटते...... तुमच्या शुक्राणूच्या पूर्तिमुळे हे जिवन मला मिळाले आहे स्त्री फक्त बलात्कार घडून आणण्याचा "साधन" हे मात्र मला आता कळले आहे....... आज कुठल्या परक्या माणसासोबत मैत्री करने हे माझी चुकी असू शकते ही खंत मी आता माझ्या मनात बाळगत आहे...... कारण पुरुष हा प्राणी हवस वृत्तीचा असतो याची सांगड माझ्या विचारांनी माझ्या हृदयाशी घातली आहे "....... जरी ही कोणा एकाच्या हातुन वाचली तरी दुसरा नराधम भर रात्री कोठेतरी लपुन माझी वाट बघत आहे पण या हरामखोरांच्या अश्या वागण्यामुळे मुलींची संख्या दिवसेंदिवस घटत आहे........ कोण सांगेल यांना की यांच्या अश्या वागण्यामुळे समाजावर आघात होत आहे पण हा क्रूरी बाप तर तिचा जन्म होताच तिच्या ईज्जतीची फिकर करुन तिचा गळा दाबुन तिला मारत आहे........... Stop child abuse..... - सागर अनंत
SP
असे वाटते उडत राहावे उडताना मला कोनिणा पहावे त्या टीव्हीतल्या डोरेमोन सारख उडून सारे शहर फिरावे.... असं वाटते उडत राहावे फुलपाखरू होऊन बाग फिरावे त्याचे काही रंग घेऊन जीवनही रंगून जावे.... असे वाटते उडत रहावे पाखरू होऊन रान फिरावे पाहता सौंदर्य वनाचे मन गहिवरून यावे.... असे वाटते उडत रहावे सारंग होऊन जग फिरावे पाहता साऱ्या डोंगर दऱ्या छोटे छोटे ते क्षण टिपावे असे वाटते उडत राहावे उडताना मला कोनिणा पहावे.... असे वाटते उडत राहावे उडताना मला कोनिणा पहावे..... लहान असताना लीहलेली एक कविता....आवडली तर नक्की सांगा.....😉
असे वाटते उडत राहावे उडताना मला कोनिणा पहावे..... लहान असताना लीहलेली एक कविता....आवडली तर नक्की सांगा.....😉 #poem
read more